केवळ महारांनीच बौद्ध धम्म स्वीकारला ?
महाराष्ट्रातील केवळ महार लोकांनीच बुद्ध धम्म स्वीकारला असा अनेकांचा गैरसमज आहे . मोठ्या प्रमाणात नसेलही पण, अनुसूचित जातींच्या ५९ जातीगटापैकी तब्बल ५३ जातीगटांनी बुद्धधम्म स्वीकारला आहे . हे २०११ ची जनगणना सांगते . महाराष्ट्रात अनुसूचित जातींची विविध धर्मातील एकूण लोकसंख्या १ कोटी ३२ लाख ७५ हजार ८९८ आहे . यात हिंदू [ अजा ] ८० लाख ६० हजार १३० , शीख [ अजा ] ११ हजार ४८४ आणि बौद्ध [ अजा ] ५२ लाख ४ हजार २६४ एवढी आहे .
यातील जाती अश्या ज्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला आहे , आणि त्यापुढील संख्या धम्मदीक्षा घेणाऱ्यांची आहे.➡ २०११ ची जनगणना सैर करताना मी कर्नाटकात घुसलो . तिथे अनुसूचित जाती १ कोटी ४ लाख ७४ हजार ९९२ आहेत . त्यापैकी १ कोटी ४ लाख १८ हजार ९८९ हिंदू आहेत , शीख २१०० तर बौद्ध ५३ हजार ९०३ आहेत . इथे महार , तराळ , धेगुमेगु ६६ हजार ६८ आहेत . पण यापैकी केवळ ५ हजार ७०१ बौद्ध आहेत तर हिंदू [ ज्यांनी बौद्ध नोंदविले नाही ते ] ६० हजार ३४८ असून शीख फक १९ आहेत . माझ्यासाठी धक्कादायक बाब अशी की , इथे सर्वाधिक धम्म स्वीकारणारी जात महार नसून , होलया , होलेर , होलेया ही आहे . यांची संख्या ७ लाख ९२ हजार ७८५ असून हिंदू ७ लाख ५५ हजार २६६ , शीख १६१ आणि बौद्ध ३७ हजार ३५८ आहे . आदी कर्नाटका या जातीच्या २ हजार ३४९ लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला . आदी द्रविडा २८७ / भोवी ओड , ओद्डे , वड्डर २१९ तर जेनेरिक जाती ४०६४ बौद्ध आहेत.
➡ गुजरात मध्येही महार , तराळ , धेगुमेगु ही जात आहे . ती २८ हजार ४१७ असून हिंदू [ बौद्ध न नोंदविलेली ] २० हजार ६८२ आहे , शीख १०८ तर बौद्ध ७ हजार ६२७ आहे . इथे भाम्बी , भाम्भी व चमार ह्या जातीगटातील १०२४ लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला.
➡ पश्चिम बंगाल मध्ये महार ही जात आहे . ३४ हजार ७९३ पैकी हिंदू [ ज्यांनी बौद्ध नोंदविले नाही ते ] ३४ हजार ४५५ , शीख १७ तर बौद्ध केवळ ३२१ आहे . नामशुद्र ही सर्वात मोठी जात असून ३५ लाख ४ हजार ६४२ आहे . त्यात फक्त ३१० बौद्ध आहेत.
➡ गोवा राज्यात सुद्धा महार आहेत , त्यांची एकूण संख्या १२ हजार ८१८ आहे त्यापैकी १२ हजार ६७७ हिंदू असून बौद्ध केवळ १४० नोंदलेले आहेत.
➡ मध्य प्रदेशात एकूण १ लाख ९९ हजार ४२६ बौद्धांपैकी महार , मेहरा व मेहर या जातीतून आलेले १ लाख ६० हजार ६२२ लोक आहेत . त्याबरोबर चमार , चमारी या जातीगटातील २८ हजार २५६ / डोहोर मधून ३ हजार ७०९ , बलाही , बलाई २९५ / भंगी, मेहतर, बाल्मिकी २९२ / खनगर , कनेरा , मिर्धा १२५ / मांग , मांग गारोडी ३१३ / पासी ५७ / कोली , कोरी ३१० / डोम , डूमार ८४ / बसोर , बुरुड , बंसोर ८४ , बरहर , बसोड ७१ / होलीया ९१ / कटिया , पठारीया ९९ व जेनेरिक जाती ४६६८ आदी बौद्ध आहेत.
➡ पंजाबात आदी धर्मी १८ हजार ७७८ / बाल्मिकी , चुहडा १५८८ / मझबी , मजहबी शीख १६० हे बौद्ध आहेत . कबीरपंथी , जुलाहा ३९ / कोरी . कोली २२ / डुम्मा , महाशा , डुर २७ / बाजीगर ३९ / खाटिक १० / बौरिया बावरिया १० / पासी १८ / सांसी , भेडकुल १८ / महत्तम , राय सिख ६० इत्यादी बौद्ध आहेत.
➡ आंध्र प्रदेशात महार ३६ हजार २३८ आहेत त्यापैकी ११ हजार २६० जणांची बौद्ध म्हणून नोंद आहे . त्यापेक्षा माला या जातीतून १२ हजार ७२९ बौद्ध झालेत , माले साले , नेटकनी ४६८ / मादिगा १००३ / मांग ९७ / मेहतर ५३ बौद्ध आहेत.
ती माणसे मूर्ख आहेत जी समजतात केवळ महारांनीच बौद्ध धम्म स्वीकारला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा