वैशिष्ट्यीकृत पोस्ट

निपून सभी शस्त्रों में हम !

  ना मशीनगन में ही कौशल  निपून सभी शस्त्रों में हम ! डिसेंबर १९४७ : पुंछ,कोटली,झांगर, राजौरी,माचोई आणि नौशेरा उंच हिमालय पर्वतावरील एक ब...

रविवार, ४ जून, २०२३

दलित......बौद्ध

 दलित......बौद्ध

- आनंद गायकवाड 


#दलित की बौद्ध हा वाद सद्या ऐरणीवर आला असून. दलित या शब्दाची व्याख्या करणे सुरू आहे. कधी संस्कृत व्याकरणाचा आधार घेतल्या जात आहे तर कधी मराठी. दल पासून दलित बनला असे सांगीतल्या जात आहे. पाली प्राकृत मध्ये दल पासूनच दलिद्द म्हणजे दरिद्री असा शब्द तयार झाला आहे. दलिद्द पासून मराठीत अपभ्रंश होऊन दलिद्दर किंवा गावठी दलिंदर बनला असे दिसते जी शिवी समजली जाते.

दलित हा शब्द अस्पृश्याचा पर्यायवाची शब्द आहे. हे अनेक विचारवंतांनी म्हटले आहे. अलीकडे सुखदेव थोरात यांचे " दलित : निरंतर विषमता आणि दारिद्र्य हे पुस्तक वाचण्यात आले. त्यांनी अनुसूचीत जातींसाठी दलित हा शब्द योजिला आहे. खुद्द बाबासाहेब अस्पृश्यांसाठी नाईलाजास्तव दलित हे नामाभिधान वापरतात. "अस्पृश्यांसाठी एकच नामाभिधान योजिता आले असते तर माझ्याकरिता यापेक्षा इतर कोणतीही बाब अधिक आनंददायी ठरली नसती". असे बाबासाहेब म्हणतात, पुढे ते म्हणतात ,पण मला तसे करता आले नाही यात सर्वस्वी माझा दोष नाही. वेळोवेळी शासकीय व अशासकीय स्तरावर अस्पृश्यांसाठी या भिन्नभिन्न नावांचा उपयोग करण्यात आला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट #Government of India Act मध्ये "अनुसूचित जाती " असा उल्लेख आहे. पण त्यांना हे नाव 1935 नंतर दिले गेले. त्यापूर्वी श्री. गांधी त्यांना हरिजन म्हणून संबोधित होते तर शासन त्यांना पददलित वर्ग म्हणून संबोधित होते. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी कोणत्याही एका नामाचा उपयोग करणे मला शक्यच नव्हते. एक नाम एके ठिकाणी योग्य होते. तर तेच नाम दुसऱ्या ठिकाणी अप्रस्तुत वाटत होते. परंतु ही सर्वनामे एका विशिष्ट जमातीचा उल्लेख करण्यासाठी समान अर्थाने योजिली आहेत. #(प्रस्तावना- काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले) ..अखेर #14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी दलित या शब्दाला मुठमाती दिली.त्यांनी नवदिक्षितांना बौद्धजन म्हटले. #डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यामागे काय कारणं होती? 

- भारतातील कोट्यवधी आदिवासी व ओबीसी स्वतःला दलित मानीत नाही. तिकडे ब्लॅक या नावाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे निग्रो स्वतःला दलित मानत नाहीत. त्यांना ब्लॅक म्हणणे आवडते, त्यांनी आपली अस्मिता त्यात शोधली. भाषिक, प्रांतीय, खंडीय, रंगभेदी संबोधने दलित या हिणकस नावाशी कसे समांतर असू शकते ?

- बौद्ध हा शब्द वैश्विक आहे. समस्त दुःखितांना कवेत घेऊन त्यांच्या समता, स्वातंत्र्य व बंधुभावाची हमी घेणारा आहे तसेच त्यांचे मनोबल वाढवून प्रत्येक अन्यायाच्या विरोधातील युद्धात त्यांना समर्थपणे उभा करणारा आहे. उलट दलित हा शब्द आधीच त्याचे मनोबल खच्ची करतो. बाबासाहेबांचे बुद्ध धम्मावरील विचार या दलितवादी बुद्धिवंतानी वाचले पाहिजेत. "दलित साहित्यिकांनी #डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी आणि विचारप्रणाली नीट समजून घेतली पाहिजे. त्यावर चिंतन मनन केले पाहिजे" असे 16 व्या अस्मितादर्श साहित्य मेळाव्याचे ( मे 1990)अध्यक्ष डाॅ. स.दा. कऱ्हाडे त्यांच्या भाषणात म्हणालेच होते.

- दलित म्हणजे अस्पृश्य अशी व्याख्या खुद्द बाबासाहेबांनी केली. दलित या शब्दाला आपापल्या परीने इतरांनी रेखाटले कारण हा शब्द तशी मुभा देतो, वाव देतो. 

- दलित चिंतन के सरोकार या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डाॅ. हरदयाल म्हणतात "केवल महात्मा फुले या अम्बेडकर की विचारधाराही दलित-चेतना और दलित साहित्य की विचारधारा नही है, अपितु मार्क्स , गांधी, लोहिया आदि की विचारधाराने भी दलित- चेतना और दलित साहित्य के निर्माण मे योगदान किया है ! हमारे विचार से यह स्वस्थ और श्रेयस्कर दृष्टी है !"

- डाॅ. रमेशकुमार स्वतः कबुली देतात, "दलित-साहित्य और दलित चिंतन को विकसित एवं अग्रसर करने मे गांधीवाद, मार्क्सवाद , लोहियावाद और अम्बेडकरवादी विचारधारा का विशिष्ट योगदान रहा है ! इन विचारधाराओं ने दलित-साहित्य और दलित-चेतना को एक तार्किक आधारपर खडा किया !"

या परस्परविरोधी विचारधारा दलितांच्या मेंदूला कसा आकार देत असतील हा चिंतनाचा विषय आहे.

- याही पुढे जाऊन दक्षिणेतील दलित विचारवंत कांचा इलैय्या आपले मत मांडतात. त्यांना दलित शब्द अपुरा वाटतो की काय म्हणून त्यांनी दलितबहुजन हे नाम स्वीकारले. दलित शब्द देखील केवळ 'तथाकथित अस्पृश्य जातींचा'च अर्थ सांगतो. आंध्र प्रदेशातील 'दलित महासभा' सारख्या संघटनांनी अनुसुचित जाती, अनुसूचित जनजाती आणि मागासजातींसाठी दलित शब्दाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील प्रेस आणि जनतेने हा शब्द प्रत्यक्ष व्यवहारात जास्त प्रमाणात स्वीकारला नाही" म्हणून कांचा इलैय्या दलितबहुजन असा शब्द वापरतात. यावर कडी म्हणजे ते दलितवाड्याचा आदर्श पुढे करून संपुर्ण दलितकरणाचा आग्रह धरतात. ते म्हणतात आम्ही समग्र समाजाचे दलितकरण करावे. दलितकरणानेच सगळ्या भारतीय समाजात एका नवीन समतावादी भविष्याची स्थापना होईल. ( मी हिंदू नाही कारण...कांचा इलैय्या )

- याही पेक्षा घातक विचार उत्तर भारतीय तथाकथित दलित लेखक व विचारवंतांनी मांडलेत. त्यांनी सपशेल बुद्धाला नाकारून दलित धर्माची थिअरी मांडली. या मुखंडात डाॅ. धर्मवीर हे प्रमुख असून मेहर सिंह पुषण, डाॅ.श्यौराज सिंह 'बेचैन',मोहनदास नैमिशराय, कैलाश दहिया इत्यादी आहेत. दलित धर्माची नाळ त्यांनी आजीवक मख्खली गोसाल याचेशी जोडली असून संत कबीर व रैदास हे दलित धर्माचे आधार आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. 

#अपने अपने पिंजरे या नैमिशरायच्या आत्मकथनात बुद्धावर टीकात्मक टिप्पणी केली आहे.डाॅ.धर्मवीर या नैमिशरायला 'हमारे नए बुद्ध' म्हणतात. अपने अपने पिंजरे के आत्मकथाकार हमारे नए बुद्ध है. वे उन पुराने राजकुमार सिद्धार्थ की तरह नही है जिन्होने अपने प्रश्नोके उत्तर की खोज मे घर छोडा था.( अम्बेडकर इन इंडिया, मई 2009 ).   

         पुढे धर्मवीर समीक्षा करताना म्हणतात,उन्हे सामाजिक विषमता से टकराना है और आजीवक समाज की संसार शुद्धी लानी है, पुराने बुद्ध की तरह घर-बार छोडकर व्यक्तिगत निर्वाण प्राप्त नही करना. बुद्ध बने उन पहले राजकुमार की समस्या छोटी और व्यक्तीगत थी जबकी मक्खली महान बने हमारे आजीवक श्रमजीवी की समस्या बडी और सामूहिक है.(उक्त). कैलाश दहिया या कवी तथा टीकाकाराने धर्मवीर यांची मुलाखत घेतली. त्यात धर्मवीर म्हणतात, जहातक कबीर का सवाल है उनका और बुद्ध का रास्ता ही बिल्कुल अलग है! वे विपरीत ध्रृवों पर खडे है! एक सद्गृहस्थ है तो एक घर छोडकर भागा संन्यासी......कबीर का चिंतन राष्ट्र रक्षा का है, जबकी बुद्ध का चिंतन इस देश को गुलाम बनाने का! दुसऱ्या एका उत्तरात धर्मवीर म्हणतो, अलग धर्म के बगैर दलितोंका उत्थान असंभव है! वैसे भी दलितोंकी अलग परम्परा रही है! इस ऐतिहासिक और जीवित परम्परा के, जिसे मै आजीवक कह रहा हू, पुरे प्रमाण मौजूद है! -(बयान, दिसम्बर 2009)..याच पत्रिकेच्या जुलै 2009 च्या मुलाखतीत धर्मवीर म्हणतात, इस आजीवक परम्परा का #बौद्ध धर्म से भी कोई लेना-देना नही है! .
..बौद्ध जीवन शैली हमारे अनुरूप नही !हम मेहनतकश जाति के लोग है ! मठ शैली व्याभिचार पैदा करती है! हे धर्मवीर पुढे आपले खरे दात दाखवतात,हम आजीवक है और हम इस देश के वैसे ही नागरिक है जैसे सिख, ईसाई, हिंदू, जैन या बौद्ध तो इससे उनमे खलबली मची हुई है! दलित चिंतन का विकास या धर्मवीरच्या पुस्तकावर टिप्पणी करताना कैलाश दहिया म्हणतो उनके चिंतन से साफ हो गया है कि दलितों को धर्म बदलने की कोई जरूरत नही बल्की मजबूतीसे अपनी जमीन पर खडे रहने की जरूरत है!(बयान, अप्रेल 2009)

- या धर्मवीर ने #थेरीगाथा की स्त्रियां और डाॅ. आंबेडकर हे पुस्तक लिहून बौद्धांना डिवचण्याचे काम केले. ही सर्व दलितवादी मंडळी बौद्ध विरोधी काम करीत आहेत. महाराष्ट्रात जसे दलितवादी विचारवंत उड्या मारून बुद्ध नाकारण्याचे उपद्व्याप करताहेत तसे धर्मवीर आणि कंपूचे सुरू आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा वारसा घेतलेले शान्तिस्वरूप बौद्ध, डाॅ. विमलकिर्ती, अनीता भारती, डाॅ.सुरेन्द्र अज्ञात,डाॅ. जयप्रकाश कर्दम, शीलप्रिय बौद्ध,आचार्य बलदेव उपाध्याय, प्रो.डाॅ. संघसेन सिंह, भद्रशील रावत, सतनाम सिंह, स्वरूप चंद्र बौद्ध, डाॅ.धर्मकिर्ती व आचार्य जुगल किशोर बौद्ध इत्यादी बौद्धजन या दलित आजीवकांचे कंबरडे मोडताहेत. 

डाॅ.विमलकिर्ती म्हणतात डाॅ.धर्मवीर और कुछ तथाकथित दलित बुद्धिजीवी, लेखक,साहित्यकार, पत्रकार,संपादक आदि आजीवकवाद,आजीवकधर्म, दलित धर्म के नाम पर दलितों को हिन्दुत्व के जाल मे ही उलझाकर रखने की पूरी कोशिश कर रहे है और उनका पहला टारगेट बौद्धधम्म है और दूसरा टारगेट है डाॅ. आंबेडकर!

- जे दलितवादी असे म्हणतात की, अजूनही बौद्ध धर्मिय शंभर टक्के बौद्ध झाले नाहीत त्यांच्यासाठी डाॅ. विमलकिर्ती चे हे विधान झणझणीत अंजन असेल, बौद्ध परिवारों मे खुलापन है, धार्मिक अंधश्रद्धा और धार्मिक आडम्बर नही है और अगर जहां भी बौद्ध परिवारो में इस तरह के धार्मिक आडम्बर , अंधश्रद्धा,कुण्ठा है वह उनमे हिन्दू धर्म से विरासत मे मिली है जो उनके पक्के और सच्चे बौद्ध बनने से धीरे-धीरे समाप्त हो जाएगी ! बौद्धो मे सामाजिक और सांस्कृतिक दृष्टि से बदलाव की रफ्तार हिन्दू परिवारों से भी तेज है और मुस्लिम परिवारों से भी कई गुना तेज है!

 #कंवल_भारती याही पुढे जाऊन म्हणतात, "दलितों के बौद्ध बन जाने के बाद लोकसभा और विधानसभा मे दलित वर्ग के लिये आरक्षित सीटों की संख्या कम हो गयी है ! पर यहा हमे यह भी मानना होगा कि भविष्य में राजनैतिक क्षेत्र मे नव बौद्ध अन्य धार्मिक अल्पसंख्यक समुदायों के साथ मिलकर शासक वर्ग की शक्ती बनकर भी उभर सकते है" ! ज्यांना बौद्धांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे त्यावर हे विधान चपखल बसते. सामाजिक शक्ती घटली नसून ती वाढली आहे असे कंवल भारती म्हणतात, क्योंकी पहले मनोबल कम था, जो अब बढ गया है! बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याने आपले मनोबल वाढेल हे बाबासाहेब सांगायचेत ना. बौद्धांची सर्व क्षेत्रात आगेकुच सुरू असून दलित समजल्या जाणाऱ्या वर्गांसाठीही ते मैदानात उतरतात. ज्या दलितवाद्यांना वाटते की बौद्धजन दलितांचा हात सोडतात त्यांना आर.एस. आदिल यांच्या आंबेडकरवादियों के लिये इस्लामी संदेश या पुस्तकातील प्रश्नावर कंवल भारती उत्तर देतात,आदिल साहब ने अपने आरोप या विश्लेषन मे दलितों और नवबौद्धो, दोनो को मिलाकर देखने की कोशीश की है, जबकी दलित अलग है और नवबौद्ध अलग है ! दलित का संबंध हिंदू धर्म से है, जबकी नव बौद्ध हिंदू धर्म छोड चुका है ! दलित पर अत्याचार इसलिये होते है, क्योंकि हिंदू धर्म दलित पर अत्याचार करने की शिक्षा देता है ! नव बौद्धों पर दलित के मुकाबले काफी कम अत्याचार होते है और जो होते है, उसका कारण दलितोंका हिंदू धर्म त्यागकर उस धर्म को अपनाना है,जो हिन्दुत्व और ब्राह्मणवाद का सबसे बडा शत्रु है ! नव बौद्ध अत्याचार के विरुद्ध संघर्ष करने मे सक्षम है, जबकी दलित नही है ! दलित पर अत्याचार के विरुद्ध नव बौद्धों का संघर्ष इसलिये है, क्योंकि वह उनकी सम्वेदना का विषय है ! अन्याय का प्रतिकार और करुणा का विस्तार बौद्ध धर्म की मूल शिक्षा है ! फिर दलित नवबौद्धों के सहोदर ही है!( दलित धर्म की अवधारणा और बौद्ध धर्म : कंवल भारती) 

अलीकडे गुजरातच्या #उना मधील आंदोलनात पंचशीलेचे ध्वज फडकत होते ही बाब याचा प्रत्यय आणून देणारी आहे.

- दलित या नामाभिधानाला स्वीकारणारे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला नाकारतात पर्यायाने बुद्धाला नाकारतात. बाबासाहेबांच्या विचारांचा व समस्त लढ्याचा पायाच बुद्ध आहे. ते बौद्ध शब्द जसे नाकारतात तसे आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी साहित्य,आंबेडकरवाद हे नाम ही नाकारतात. साहित्यात त्यांना केवळ ललित लेखन हवे आहे तत्त्वज्ञान नाही परंतु तत्त्वाशिवाय हे साहित्य निव्वळच कलावादी ठरेल. प्रस्थापित मराठी साहित्याला नकार देऊन आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य निर्माण झाले. तरीही सुनिल खोब्रागडे यांनी 'अखिल भारतीय मराठी साहित्य संगिती' घेतली. संगिती हा बौद्ध संस्कृतीतील शब्द वापरून त्यांना काय सांगायचे होते हा प्रश्नच आहे. त्यांनी दलित साहित्य या शब्दाला का फाटा दिला असावा. दलित शब्दासाठी हातभर लेख लिहून अखेर अखिल भारतीय नसलेल्या मराठी साहित्याची री का ओढली?         दलित,आंबेडकरी,आंबेडकरवादी, फुले-आंबेडकरी,बहुजन आदी नामाभिधान न योजिता अरूण गवळीच्या अखिल भारतीय सेना सारखे हे साहित्य संमेलनाचे शीर्षक का निवडले? वस्तुतः बुद्ध तत्त्वज्ञानाला दुर्लक्षित करण्यासाठी हा सगळा आटापिटा चाललेला आहे. अविनाश डोळस म्हणतात त्यानुसार तर ही मंडळी अशी वागत नसावी ना! कालचा केवळ श्रमजिवी असलेला समाज आज मध्यमवर्गीय बनला आहे. मध्यमवर्गाचे गुणधर्म त्याच्यातही आले आहेत. हा प्रथम स्वतःला सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात असतो. हाच साहित्यनिर्मिती,उत्साहाचा कर्ता- करविता असतो. आंबेडकरी समूह हा परिवर्तनाचा वाहक होणे स्वाभाविक आहे. परंतु तो आज जाहीरपणे आंबेडकरवाद , आंबेडकर विचार, आंबेडकर चळवळ म्हणत असला तरी त्या चळवळीशी फारसा संबंधित राहिला आहे असे दिसत नाही.( अध्यक्षीय भाषण, 12 वे अ.भा. आंबेडकरी साहित्य संमेलन,घुग्घुस जि. चंद्रपूर 16 ते 19 जाने. 2015).

- दलित या शब्दाशी सुद्धा ही माणसे प्रामाणिक नाहीत. ज्यांना दलित हे नामाभिधान वापरायचे असेल त्यांनी ते खुशाल वापरावे मात्र आंबेडकरी वैचारिक विश्वाचा पाया असलेल्या बुद्धाला नाकारून वा त्याला मर्यादित समजून प्रस्तावित करण्याचा करंटेपणा करू नये. #डाॅ. विमलकिर्ती म्हणतात त्याप्रमाणे आपल्याही म्हणता येईल, बाबासाहेब डाॅ.आंबेडकर जिस बुनियाद पर खडे है , उनका चिन्तन जिस बुनियाद पर खडा है उसको काटने में सनातनी हिन्दू भी सफल नही हुए है , आर.एस.एस. वाले भी सफल नही हुए है,गांधीवादी भी सफल नही हुए है, अरूण शौरी भी सफल नही हुआ है, बाबू जगजीवनराम भी सफल नही हुए है तब डाॅ. धर्मवीर की तो बात ही क्या है!

- या धर्मवीर च्या समोर तुम्ही आणखी नावे लिहू शकता.

 ----------------------------------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा