सफाई कामगार अर्थात भारतातील भंगी समाज. हजारो वर्षापासून उच्चवर्णीयांच्या घाणीला साफ करण्याचे काम करताहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सफाईच्या कामाची निंदा केली आहे. " भंगी लोक तर स्पृश्य लोकांना एका क्षणात नमवू शकतील . त्यांचा धंदा जरी नीच मानण्यात आला तरी त्या धंद्याची उपयुक्तता इतकी जबरदस्त आहे की , त्यांनी मनात आणले तर रोगाचे सत्र साऱ्या शहरात पसरून ते सारी वस्ती नामशेष करण्यास कारणीभूत होऊ शकतील " [ बहिष्कृत भारत : २३ डिसेंबर १९२७ ] …. या विधानात त्यांचा धंदा " नीच ' आहे असा शब्द वापरण्यात आलेला आहे. यावरून असे म्हणता येईल कि बाबासाहेब सफाईच्या या धंद्याला उच्च मानीत नव्हते . महार वतनामध्ये गावात स्वच्छता ठेवण्याचे काम जे महारांच्या शिरावर ठेवण्यात आले होते ते कसे बेकायदेशीर आहे हे सांगतांना बाबासाहेब म्हणतात ठराव क्र. ६ … " गावात स्वच्छता ठेवणे हे महारांचे एक काम आहे असे ता. २८ जून १८८८ च्या ४२७३ च्या सरकारी ठरावाने ठरविण्यात आले. परंतु वतनदार कामदारासंबंधाच्या कायद्याच्या चौथ्या कलमाशी हा ठराव विसंगत आहे , तरी तो सरकारने ताबडतोब रद्द कारवां , अशी या परिषदेची आग्रहपुरःसर सुचना आहे " …ठराव क्र ७ …. " हे वतनदार कामदारासंबंधांच्या कायद्याच्या चौथ्या कालमावरून व सदरील ठरावावरून स्पष्ट होते . तरी महारांना रयतेच्या खाजगी कामाच्या जबाबदारीतून मुक्त करणे अवश्य आहे. असे या परिषदेचे मत आहे " [ बहिष्कृत भारत : २ सप्टेंबर १९२७ ] ' ठराव ताबडतोब रद्द करावा ' आणि " जबाबदारीतून मुक्त करणे " हे वाक्य सफाई कामाच्या निषेधाचे द्योतक आहे. सफाई काम अथवा भंगी काम , ' भंगी काम करणाऱ्या गर्भवती महिलेला आपल्या मुलासाठी सफाई कामगाराच्या पदाची भूल पडते ' अश्या आशयाचे उदगार बाबासाहेबांनी काढले आहे. हजारो वर्ष उच्चवर्णीयांची घाण साफ करण्याची भंगी समाजाची मानसिकता महात्मा गांधींना प्रिय होती. म्हणून त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सफाईच्या कामाचे उदात्तीकरण केले. भंगी समाजाने हे काम कधीच सोडू नये या साठी गांधींनी स्वतः हातात झाडू घेऊन भंगी समाजाला मानसिकरीत्या 'ब्लॅकमेल ' केले. नरेंद्र मोदी तेच करताहेत. हा कट्टर मनुवादी संघीय माणूस भंगी समाजाला उच्च पदे देऊ शकत नाही कारण त्याचा धर्म तशी मुभा देत नाही. त्याची धर्मसंसद समस्त दलितांच्या उत्थानाच्या विरुद्ध आहे. म्हणून तो भंगीकामाचे उदात्तीकरण करतोय. आमच्या गृहिणी किंवा आम्ही सफाई काम घरात करतोच पण …समाजकार्य म्हणजे फॅशन समजणारे , अंबानी , आमीर , अमिताभ इत्यादी गर्भश्रीमंत माणसे मोदीच्या या वर्णव्यवस्था मजबूत करण्याच्या आणि भंगीकामाच्या पावित्र्याच्या जातीयवादी कामात हातभार लावताहेत. फक्त एक दिवस सफाई करून ही माणसे पुन्हा शेकडो वर्ष भंगीलोकांना त्याच कामात गुंतवून ठेवण्याच्या कामात लागले आहेत. नरेंद्र मोदी म्हणतात … कलम को झाडू बनावो , आणि बाबासाहेब झाडूला कलम बनवायला सांगतात …. हाच फरक आहे गांधी, मोदी आणि बाबासाहेबांमध्ये. बाबांना झाडूवाला जज पाहायचा आहे आणि गांधी व मोदीला झाडूवाला भंगी जगाच्या अंतापर्यंत हवा आहे …कारण हाच हिंदू धर्मशास्त्रांचा संकेत व कायदा आहे जो कोणताही हिंदू स्वप्नातही तोडू शकत नाही आणि धर्ममार्तंड ते तोडू देत नाही. ज्या दिवशी वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाला बाबासाहेब समजतील तेव्हा गांधी व मोदी जमीनदोस्त होतील.
- आनंद गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा